गुरुनाथ तिरपणकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /बदलापूर:
MMRDA ने कुळगांव-बदलापुरसाठी मंजुर झालेला विकास आराखडा जनतेसाठी खुला करावा,तसेच खाजगीकरणातून डायग्नोस्टीक सेंटर सुरू करावे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ पाठपुरावा करणार आहे.
शहरातील लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे.बदलापुर शहरातील तमाम सर्व नागरिकांनी सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या अधिपत्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे.ब-याच नागरी सुविधा नगरपरिषदेशी निगडीत आहेत.विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने M.M.R.D.A यांनी मंजुर कलेला विकास आराखडा प्लॅनसहीत नगरपरिषदेने जनहितार्थ सर्व नागरिकांसाठी खुला करावा.विकास आराखड्यासंदर्भातील चौका-चौकात फलक लावावेत.तसेच जनतेला कल्याण-डोंबिवली, ठाणे,मुंबई याठिकाणी उपचारासाठी जावे लागते,लोकसंख्येनुसार बदलापुरात सुसज्ज हाॅस्पिटल नाही.त्याकरिता महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधुन नगरपरिषदेच्या पुढाकाराने खाजगीकरणाच्या माध्यमातून डायग्नोस्टीक सेंटर सुरू करण्याची मागणी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने केलेली आहे.
महासंघाच्या पदाधिकारी व कोअर कमिटी सदस्यांनी या विविध नागरी सुविधा संदर्भात नगरपालिकेला ई मेलद्वारे निवेदने पाठविण्यात आलेली आहेत.बदलापुर शहर हे सुज्ञ,सजग,सुशिक्षित नागरीकांचे शहर आहे. आपल्या विविध नागरी सुविधा संदर्भातील मागण्या नगरपरिषदेकडे ई-मेलद्वारे पाठविणे आपले कर्तव्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे पदाधिकारी प्रत्यक्ष भेटुन विचारविनीमय करतीलच.याकरिता समस्त बदलापुरकर नागरीकांनी उत्स्फूर्तपणे Email:kbmc123@gmail.com या ई मेल आयडीवर आपल्या नागरी सुविधा संदर्भातील स्वतःच्या नावाने निवेदन पाठवावे अशी विनंती जेष्ठ बदलापुरकर महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक व मुख्य निमंत्रक बाळासाहेब सावंत यांनी केली आहे.



संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती