वादग्रस्त पद्धतीने काम मंजूर केल्याचा ठपका
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस नगरपंचायतीच्या वतीने नगरोत्थान योजनेअंतर्गत जाधववस्ती ते येळीव मायनर रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी बेकायदेशिरपणे व घाईगडबडीत वादग्रस्तरित्या मंजुरी दिल्याबाबत माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा द्रोपदी देशमुख यांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करत सदर प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या कामाबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. खुद्द नगराध्यक्षांनी नऊ नगरसेवकांच्या सहींचा तक्रारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. याबाबतीत सबंधित वादग्रस्त कामाची कागदपत्र मुख्याधिकाऱ्यांकडून काढून घेऊन याबाबत चौकशी करावी,वादग्रस्त पद्धतीने मंजूर केलेल्या निविदेची तातडीने चौकशी व्हावी, याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
अशी आहे तक्रार
कामाबाबत विशेष असे शासनाचे निर्देश आलेले नसताना रस्ता खडीकरण मंजूर केला.निविदा प्रक्रियेचा बंद लखोटा नियमबाह्य पद्धतीने उघडला. याबाबतीत तक्रारी केलेल्या इतर ठेकेदारांना कौन्सिलच्या मान्यतेशिवाय वकिलाकडून नोटीस व परस्पर उत्तरे देण्यात आली. कामाबाबतीत स्थायी समिती, नगराध्यक्ष व कौन्सिलची अंतिम मंजुरी प्रलंबित आहे. काम दिलेल्या संबंधित ठेकेदाराची नोंदणीमध्ये शासकीय नियमानुसार त्रुटी आहेत.करार होत असताना स्थायी समितीच्या अथवा अधिकृत नगरसेवकांची सही साक्षीदार म्हणून घेतली नाही. मुख्याधिकार्यांनी ठेकेदाराच्या कंपनीला करारा बाबतीत घाई केली.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती