अतिवृष्टीमुळे नुकसानीचा धनादेश प्रदान

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

अचकनहळळी ता.जत येथील शेतकरी विनायक परशुराम शिंदे यांना अतिवृष्टीमुळे नुकसानीचे आपत्ती व्यवस्थापनमधून 50 हजाराचा धनादेश आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,नायब तहसिलदार माळी, समाधान शिंदे,मधुकर शिंदे, उपसरपंच ,पिंटू स्वामी, बबन शिंदे, आदिक शिंदे, राहुल शिंदे, जनार्धन शिंदे, भानुदास शिंदे, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे जत तालुक्यातील शेती आणि शेती पूरक व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते.यामध्ये अचकनहळळी येथील विनायक शिंदे यांची बैलजोडी ओढापत्राला आलेल्या पुरात वाहून गेली होती.