शिराळा-खराळा रस्त्याचे काम सहा वर्षापासून अपुरे

डी.आर.वानखडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/शिराळा (जि.अमरावती):

शिराळा (जि.अमरावती )जि.प.बांधकाम विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शिराळा ते खराळा या रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षापासुन अपुऱ्या अवस्थेत आहे.ते आजपर्यत पुर्ण करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. महाराष्ट् शासन मनरेगाच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. पंरतु प्रत्यक्षात कामाची व गुणवत्तेची बोंब सर्वत्र पाहावयास मिळते. अमरावतीचे पालकमंत्री अॅड.यशोमतीताई ठाकुर यांनी या बाबीची दखल घेवुन शिराळा ते खरळा रस्त्यावर खडीकरण करुन रस्ता पुर्ण करावा अशी शिराळा व खराळा येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. शिराळा परिसरात शेतीचा व्यवसाय आहे. हा रस्ता शेतीसाठी महत्वाचा आहे.शासनाला अनेकवेळा निवेदन देवुन जाग येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी,तहसिलदार,या भागाचे आमदारांना निवेदन देवुन शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. तरीदेखील एकालाही घाम फुटला नाही.तरी संबधित अधिकारी यांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी राजेश भोवाळु,शिवा खाडे,डी.आर.वानखडे,वासुदेवराव भोवाळु ,अरविंद माकोडे ,रावसाहेब ठाकरे, अरविंद भागवत , यादव जिभकाटे ,नामदेवराव देशमुख आदींनी केली आहे.