अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील सनमडी येथील धायगुडे कुटूंबियांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने धान्य व जीवनावश्यक किट देवून मदतीचा हात देण्यात आला. रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांच्या हस्ते मदत देण्यात आली.
जत पूर्व भागातील बोर नदी पात्रात जत तालुक्यातील सनमडी येथील ३२ वर्षीय तरुण परमेश्वर उर्फ पिंटू धायगुडे हा ट्रॅक्टरमध्ये बसून दुधाचे कॅन घेवून जात असताना ट्रॅक्टर करजगी- भिवर्गी पुलावर पलटी झाला. १५ ऑक्टोबर झालेल्या या दुर्घटनेत पुरात वाहून गेलेल्या पिंटूचा मृतदेह तिसऱ्या दिवशी मिळाला होता. या घटनेने धायगुडे कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी धायगुडे कुटूंबियांची भेट घेत त्यांना जीवनावश्यक किटचे वाटप केले. परमेश्वर उर्फ पिंटू धायगुडे याचे वडील भीमराव, आई सखुबाई यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
यावेळी रासपचे अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अखिल नगारजी, बासूभाई मणेर, ज्योतिराम सावंत, मेजर सचिन सरगर, अनिल थोरात, रासपचे युवा आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अमोल कुलाळ, भाऊसो खरात आदी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन