लातूर-गुलबर्गा रेल्वे औशातूनच जावी: औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीची मागणी

मुख्तार मणियार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ औसा:

लातूर ते गुलबर्गा रेल्वे औशातूनच जावी अशी मागणी औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीच्या वतीने आ अभिमन्यु पवार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर ते गुलबर्गा हा रेल्वे मार्ग औसा मार्गे न गेल्यास निश्चितपणे औसा तालुक्यावर मोठा अन्याय होऊन तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे. प्रस्तावित रेल्वे मार्ग हा सरकार दप्तरी औसा मार्गेच नियोजित आहे. त्यामुळे त्यावर औसा तालुक्याच्या जनतेचा प्रथम हक्क आहे. लातूर ते गुलबर्गा येथे जाण्यासाठी औसा मार्ग हाच नैसर्गिक मार्ग आहे. या नियोजित रेल्वे मार्गामुळे भारतीय रेल्वेला कमी खर्चात गुलबर्गापर्यंत रेल्वे लाईन होणार आहे. हा रेल्वे मार्ग इतरत्र हलविल्यास भारतीय रेल्वेला कोट्यावधी रुपयाची आर्थिक भुर्दंडही सोसावे लागणार आहे. लोकशाही मार्गाने मागणी करणार आहे.तसेच वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचेही संघर्ष समितीच्या वतीने ठरविण्यात आलेले आहे. समस्त औसेकरांनी विधानसभा निवडणुकीत आपणास तालुक्यात तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. व तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून औसाच्या विकासासाठी हक्काच्या रेल्वेसाठी आपणही जातीने लक्ष घालून केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा कराल अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगत आहे. या मागणीचे निवेदन औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे मंत्री भारत सरकार यांच्याकडे ठामपणे मांडावी व प्रस्तावित रेल्वे मार्ग औसा तालुक्यातुनच जावे यासाठी शर्थीने प्रयत्न करावे या मागणीचे निवेदन आ.अभिमन्यू पवार यांना दिले आहे.
यावेळी खुंदमीर मुल्ला, गणेश माळजे, अडवोकेट शहनवाज पटेल, आकाश पाटील, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, जयराज कसबे, गोपाळ धानुरे, अडवोकेट संमीयोद्दीन पटेल, श्रीधर पाटील, राजू पाटील, संजय सगरे, कलीम सैय्यद, नवाब खादर, अडवोकेट राजू पटेल, , मिशाक पटेल, महमद मुगले, नदीम सय्यद लिंबराज जाधव आदी उपस्थित होते.