
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
दिवाळीनंतर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तसेच शहरातील वित्तीय संस्थामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
सद्या अनेक देशांत कोरोनाच्या दुसरे लाटेने हाहाकार माजविला असून काही देशावर परत लाॅकडाऊन करण्याची परिस्थिती उद्धभवली आहे. कोरोनाने परत डोके वर काढले आहे. लाखो लोक कोरोनाला बळी पडत चालले आहेत. अजूनतरी कोरोनावरील लसीसंदर्भात अनेक देश चाचण्याच घेत आहेत. जोपर्यंत कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत नागरिकांनी आपले हात वारंवार स्वच्छ धुतले पाहीजेत. दोन मीटर शाररिक अंतर ठेवले पाहिजे, महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपल्या तोंडाला मास्क लावला पाहीजे व सॅनिटराइजचा वापर केला पाहिजे असे सरकार वारंवार सुचना देत आहे. परंतु लोकांना त्याचे काहीही वाटत नाही.
जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तर बहुतांशी लोक तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसतात. तसेच फळे व भाजीपाला विक्री करणारे विक्रेते यांच्या तोंडाला मास्क दिसत नाहीत. तसेच ते सॅनिटराइजचा वापर करतानाही दिसत नाहीत. तरीही जत नगरपरिषदेचे व पोलीस प्रशासनाचे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. प्रशासन यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही.
मधल्या काळात या भाजीविक्रेतेपैकी दोन कुटुंबातील व्यक्ती या कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आल्या होत्या. तरीही प्रशासन यांच्याबाबतीत गंभीर दिसत नाही.
जत येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थेत तर सोशल डिस्टन्सिंगचा कायमच बोजवारा उडत असून मध्यंतरी या बॅंकेतील दोन कर्मचारी कोरोना पाॅझीटीव्ह आढळले होते. तरीही बॅंक यातून धडा घेत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
जत शहरातील चौकाचौकात अजूनही लोक गर्दी करून उभे असताना दिसतात. एकंदरीत भारतात कोरोनाने परत डोके वर काढले असून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाने कहर केला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने बळी जाणारेंची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशी अवस्था आपल्या महाराष्ट्रात,जिल्ह्यात,तालुक्यात, गावोगावी, येऊ नये यासाठी सर्वानी कोरोनावरील लस उपलब्ध होऊपर्यंत कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाक्य लक्षात ठेवावे व कोरोनाचे संकटातून आपली व आपल्या कुटुंबियांची सुटका करावी हीच अपेक्षा.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन