
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

अर्थक्रांती राष्ट्रीय साक्षरता मंच व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या जीवन गौरव अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक बैठक तासगाव येथे यशस्वीरितीने पार पडली.
अध्यक्षस्थानी अभियानाचे नियोजित अध्यक्ष वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील जगन्नाथ मोरे-पाटील होते. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
लातूर मुख्यालय व अर्थतज्ञ अनिल बोकील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ ही संस्था असून प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच यासाठी जीवनगौरव अभियान सुरू केलेले आहे.यामध्ये 60 वर्षावरील प्रत्येक भारतीय स्त्री, पुरुष शेतकरी, मजूर, व्यापारी, उद्योजक,व्यावसायिक यांना जात, धर्म,प्रांत,भाषा यांचा भेदभाव न करता दरमहा रुपये 10000 केंद्रशासनाकडून मिळण्याचा संविधानिक हक्क असावा. प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकाला प्रतिष्ठेचे जीवन लाभेल यासाठी निर्णय घेणारे स्वतंत्र मंत्रालय, कॅबिनेट मंत्री व त्या खात्यास स्वतंत्र बजेट अशी व्यवस्था केंद्र सरकारने करावी. प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकास आरोग्य संरक्षण वाहतूक कायदा व सुव्यवस्था यासारख्या सर्व सामाजिक सेवा व नागरी सुविधा विशेष श्रेणीच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी विशेष अचारसहिता बनवली जावी हा प्रस्ताव करण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी देशभर आंदोलन चालवले जात आहे. या आंदोलनात नाव नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वागत व प्रास्ताविक गजानन पाटील यांनी कोण आहे केले. अभियानाचा उद्देश व हेतू नारायण पाटील यांनी सांगितला. या अभियानाबाबत सविस्तर माहिती जगन्नाथ मोरे (पाटील ) यांनी दिली. तसेच जिल्हा कार्यकारणीची निवडही करण्यात आली.आभार गजानन पाटील यांनी मानले.
निवडलेली नवीन जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील मो.नं.8830116986,
उपाध्यक्ष एकनाथ पवार, कडेगाव मो.नं. 98 90 63 57 33 ,️सचिव गजानन पाटील तासगांव ,मो नं.98 90 20 28 84 ,️कोष्याध्यक्ष – नारायण पाटील , पलूस , मो. नं. 94 21 16 58 13 ,️संघटक – अरविंद चांडवले, आटपाडी, मो.नं. 95 45 66 92 45,सहसंघटक भगवान पाटील कवठेमंकाळ मो. नं. 9766608058 ,️सल्लागार – गोविंद परांजपे, मिरज,मो.नं.8010775309 ,प्रसिद्धी प्रमुख,ज्येष्ठ नागरिक मित्र लक्ष्मणराव खटके(संपादक,दै.प्रगल्भनायक)मो.नं.9225273841 ,️ज्येष्ठ नागरिक मित्र,अनुप वाडेकर , वाळवा , मो.नं.8788 837220


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक