प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
कोरोनाच्या संकटातून बाहेर येताना चौथा स्तंभ सन्मानपूर्वक उभा राहाणे महत्त्वाचे आहे!…
सर्वसमावेशक धोरण व इतर घटकांप्रमाणे माध्यमकर्मीशी संवाद साधून सहायता करणे आवश्यक आहे असे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याचे
मा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री
सर्व मंत्री, राज्यकर्ते,
संबधित शासकीय अधिकारी
यां सर्वाना पाठवलेल्या निवेदनातून उचित व वेळेत सहकार्य करणेची विनंती करण्यात आली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात माध्यमकर्मीसाठी वेळ द्यावा! राज्याचे माध्यमकर्मीसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवणे आवश्यक!
असंघटित आणि इतर सर्व घटकांबद्दल सहानुभूतीने विचार होतो. हितासाठी सुधारणा व मार्गदर्शक तत्त्वेतयार होतात.मग
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले, माध्यमकर्मी वंचित का?असा प्रश्नही विचारला आहे!
महाविकास आघाडी सरकार येत असतानाच माध्यमकर्मींसाठीचे सर्वसमावेशक धोरण आपल्या राज्यात येईल अशी अपेक्षा होती.
मागचे सरकारने काही जीआर घाईने तयार केले,त्यात बदल व्हायला हवा ही निवेदने आम्ही तेव्हापासून देतोय.
आमचेबाबतीत धोरणात्मक ,सर्वसमावेशक निर्णय घेताना आमचेशी संवाद साधणे महत्वाचे आहे!
नवीन कामगार कायद्या२०२०तील पत्रकार कायदे सुधारणा मश्ट आहे!
पत्रकार रजिस्ट्रेशन,त्रिपक्षीय समिती,महामंडळ गठण,सामुहिक आरोग्य विमा यावर काम होणे आवश्यक आहे.
इतर राज्यात यातील काही धोरणं ठरत आहेत, ठरली आहेत.
मात्र आपल्या राज्यात आमचेसाठी वेळ नाही;इतर महत्त्वाच्या गोष्टी होत असल्याने, माध्यमकर्मीचाविषय तितका महत्वाचा नसल्याने मागे आहे असं समजतं.
आज आपणा सर्वांना कळकळीची विनंती की, आमचेशी संवाद आणि आमचे हिताचे काम होणेसाठी सिलेक्टिव अँप्रोच जरा बाजूला करा!
आमचा विषय महत्त्वाचा का नाही,नक्की अडले कुठे,हे कळून अडचणींचा मार्ग मोकळा करायला हवा!
आमची निकड समजून मदत करणे आवश्यक आहे!
या संकटातून बाहेर येताना चौथा स्तंभ सन्मानपूर्वक उभा राहाणे महत्त्वाचे असल्याचे शीतल करदेकर यांनी नमूद केल्याचे एनयुजे महाराष्ट्र हे प्रवक्ते संदिप टक्के यांनी दिलेल्याप्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक