संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
जळभावी येथे श्री संत बाळु मामाच्या मठावर मेंढ्याचे गोल रिंगन पार पडले.गावकऱ्यांच्या मेंढरानीही सहभाग नोंदवला.तसेच लेंढी पूजनाचा पारंपारिक कार्यक्रम करण्यात आला.
संत बाळुमामाच्या मेंढ्याचा तळ १४ नोव्हेबर रोजी जळभावी येथे पालखीचे आगमन झाले .
१५ नोव्हेबर रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत हरीकिर्तन ह.भ.प.शिवाजी महाराज बोडरे गारवाड यांनी जन्मो जन्मी आम्ही / बहु पुण्य केले II तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥ या अभंगावर सुश्राव्य असे किर्तन केले . त्याना साथ संगत पेटी मास्तर हनुमंत महाराज गोरड , मृदगाचार्य दशरथ महाराज गोरड , गायनाचार्य नवनाथ महाराज सुर्यवशी , शहाजी मगर , गणेश गोरड , पत्रकार स्वप्नील राऊत होती.
१६ नोव्हेबर रोजी भाऊबिज लेंढी पुजनाचा कार्यक्रम,वालुक ढोलाच्या गजरात व सनईच्या सुरात पार पडला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाळुमामांच्या भक्तांची मांदियाळी जळभावी नगरीमध्ये दाखल झाली होती. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढवून तो परिसर भक्तांच्या समुदायाने गजबजून गेला होता.आजिनाथ (महाराज) चोरमले,बगा नं.4 चे (कारभारी) बाळु शिनगारे व राजु दादा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती