
शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /विटा:
विटा शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केटमध्ये एका नारळ विक्रीत्याच्या नारळाच्या पोत्यामध्येच साप आढळून आल्याने भाजी मार्केटमध्ये चांगलीच खळबळ उडाली. सर्पमित्राने त्याची सुरक्षितपणे सुटका केली.
नारळ विक्रेता नारळाचा माल पोत्यातून बाहेर काढून लावत असताना तो साप नारळ विक्रेत्याच्या अंगावर फुत्कारून आल्याने विक्रेता भयभीत होऊन पळाला. साप पोत्यातच थांबल्याने विट्यातील साप पकडणाऱ्या सर्पमित्रास बोलावून पोत्यातील साप पकडला. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
दरम्यान विटा भाजी मार्केटमध्ये भाजी खरदेसाठी आलेल्या एका महीलेचे पैशाचे पाकीट भाजी विकणाऱ्या एका व्यापाऱ्यांस सापडल्यानंतर त्याने हे पैशाचे पाकीट पुरावा देऊन घेऊन जावे.महिलेची खात्री करून पाकीट परत केले.या भाजी विक्री करणाऱ्या इसमाच्या प्रमाणिकपणाबद्दल सर्व भाजी विक्रेते व नागरिकांनी कौतुक केले.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती