होमगार्डचे मानधन गेल्या 3 महिन्यापासून थकीत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस सेवा बजावणारे होमगार्ड गेल्या तीन महिन्यांपासून मानधनाविनाच काम करीत आहेत.कोरोनाचा सर्वाधिक धोका 50 वर्षांवरील व्यक्‍तींना असल्याने पोलिस महासंचालकांनी 46 वर्षांवरील होमगार्ड लोकांना ड्यूटी दिली नाही.गणेशोत्सव, नवरात्र महोत्सवात प्रत्येकी पाच दिवसांचा बंदोबस्त होमगार्ड लोकांना दिला जातो. तसेच ईद, महापुरुषांच्या जयंत्यानिमित्तानेही त्यांना प्रत्येकी तीन दिवसांचा बंदोबस्त दिला जातो. होमगार्ड लोकांना प्रत्येक दिवशी किमान दहा तासांची ड्यूटी केल्यानंतर 670 रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र, कोरोनामुळे 25 मार्चपासून होमगार्ड लोकांची मदत बंदोबस्तासाठी घेतली जात होती.मात्र गेल्या तीन महिन्यापासून मानधनाविनच काम करावे लागले आहेत. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करत आहेत. पण गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे मानधन न मिळाल्याने होमगार्ड यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.दिवाळी तोंडावर असतांना मात्र शिमगा करण्याची वेळ होमगार्ड यांच्यावर आलेली आहे.दिवाळीच्या तोंडावर लवकरात लवकर मानधन देण्यात यावी अशी मागणी होत आहे.