पाच्छापूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

पाच्छापूर ता.जत येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये पाच्छापूर जि.प.शाळेसाठी जिल्हा परिषद निधीतून चार खोल्या व जिल्हा नियोजन कमिटीतून दोन खोल्या असा एकूण चाळीस लाख,व्यायाम शाळेसाठी सात लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार, बाबासाहेब कोडग, नाना शिंदे,सरपंच श्रीमती शिलाबाई कोळी, उपसरपंच दिगंबर पाटील,ग्रा प सदस्य केरबा जाधव,महेश कोळी, बाळू माने,मल्हारी जाधव ,सुनील जाधव,सुनील पाटील, विद्यानंद भोसले,नितीन शिंदे, संजय सावंत,सुरेश सावंत ,जगन्नाथ पाटील तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.