माळशिरस तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतीच्या प्रभाग , सदस्य संख्येवर शिक्कामोर्तब


संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

माळशिरस तालुक्‍यातील ज्या 49 ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत नोव्हेंबर व डिसेंबर 2020 या महिन्यात संपत आली आहे,अशा मुदत संपणाऱ्या 49 ग्रामपंचायतीसाठी तेथील नागरिकाकडून प्रशासनाच्या वतीने हरकती मागवण्यात आल्या होत्या. 16 ग्रामपंचायतीसाठी एकूण 43 हरकती प्रशासनाकडे आल्या होत्या. या हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांच्यापुढे घेण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय देऊन निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची प्रभाग संख्या व सदस्य संख्या यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली.
नोव्हेंबर-डिसेंबर 2020 या महिन्यात मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायती, त्यांची प्रभाग संख्या व कंसात सदस्य संख्या याप्रमाणे : पिंपरी – 4, (11), कोंडबावी – 4, (11), कुसमोड 3 (9).महाळुंग 6 (18), पिरळे 4 (11), बोरगाव 5 (15), मोरोची 5 (13), खलवे 3 (7), कळंबोली 3 (9), गिरवी 4 (11), फोंडशिरस 6 (17), विठ्ठलवाडी 3 (7), गिरझणी 4 (11), अकलूज 6 (17), कुरबावी 3 (9), माळखांबी 3 (9), भांब 3 (9), नातेपुते 6 (17), कोथळे 3 (9), संग्रामनगर 5 (15), बांगर्डे 3 (9), चाकोरे 4 (11), रेडे 4 (11), बोंडले 3 (9), तोंडले 3 (9), दसूर 3 (9), बचेरी 4 (11), शिंगोर्णी 4 (11), फडतरी 4 (11), गणेशगाव 3 (7), बाभूळगाव 3 (9), गोरडवाडी 4 (11), जळभावी 3 (9), विझोरी 4 (11), एकशिव 4 (11), तांदुळवाडी 6 (17), उंबरे (वे) 3 (9), मिरे 3 (9), मळोली 5 (15), शेंडेचिंच 3 (7), तांबवे 4 (11), बिजवडी 3 (7), गारवाड 4 (11), येळीव 3 (7), मांडवे 6 (17), विजयवाडी 3 (9), लोणंद 3 (9), शिंदेवाडी 4 (11), मांडकी 3 (9). या तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायती पैकी महाळुंग, फोंडशिरस, अकलूज, नातेपुते, तांदुळवाडी, मांडवे या सहा ग्रामपंचायती मोठ्या ग्रामपंचायती असून त्यांची सदस्य संख्या 17 आहे.

१६ नोव्हेंबर पर्यंत ४६ तर १५ डिसेंबर २०२० रोजी ३ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ पासून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र यानंतर कोरोना महामारी मुळे ही प्रक्रिया थांबली होती. नुकतेच २ नोव्हेंबर रोजी ही प्रक्रिया पूर्णत्वास आली. त्यामुळे तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण अंतीम नमुना अ प्रसिद्ध करण्यात आले यात १८ ग्रामपंचायती मधून ४३ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या .यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी हरकतींचा विचार करून कायदेशीर बाबी तपासून निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अंतिम प्रभाग रचना नमुना “अ “प्रमाणे निश्चित करून सदर माहीती तलाठी , मंडल अधिकारी व तहसिल कार्यालयात 2नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली.