संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीच्या निवडी जाहीर करण्यासाठी माळशिरस येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विनोद बाबर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते नूतन अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार निनाद पाटील यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी उदय कदम तसेच मनोज राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे.अध्यक्ष निनाद पाटील,उपाध्यक्ष उदय कदम, मनोज राऊत,कार्याध्यक्ष एल.डी.वाघमोडे,सचिव संजय हुलगे,सहसचिव लक्ष्मण राऊत,खजिनदार दिनेश माने देशमुख, प्रवक्ते बंडू पालवे, प्रसिद्धी प्रमुख शाहरुख मुलाणी
यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ऍड.जी. पी.कदम,प्रा.विनोद बाबर,धनंजय पवार, संजय देशमुख, जयराम घाडगे ,नितीन मगर,शिवम कांबळे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती