अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण :
दुचाकी वाहनासाठी एम.एच.50- एस ही नवीन मालिका दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येणार असून इच्छुक वाहनधारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ‘ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेाकोरेपणे नेमून देण्यात येतील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. आकर्षक नोंदणी क्रमांक संगणकीय वाहन 4.0 या प्रणालीवर देण्यात येत असल्यामुळे अर्जासोबत आधार कार्ड,ई-मेल आयडी, मोबाईल नंबर,पिनकोड नंबर,मतदान ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यत आहे.
एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे डीमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 30 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती