
अक्षय बनसोडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क,कडेपूर/आटपाडी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर (ता.कडेगाव) शाखेतील ग्रंथालय परिचर दत्तात्रय बोंगाळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या छत्रछायेखाली संस्थेत सेवेला सुरुवात केली. बापूजींचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभला. ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे सच्चे सेवक होते.
त्यांनी यापूर्वी संस्थेच्या जत, मिरज, तासगाव व कडेपूर या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन