
पोपट वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दिघंची:
भारत देश बुद्धमय करणे हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करूया. त्यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारे संविधान लिहिले आहे,असे प्रतिपादन कवी राहुल वाघमारे यांनी दिघंची येथील बुद्ध विहारांमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात केले.
मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे म्हणाले, जगाला युध्दाची नाही,बुध्दाची गरज आहे. आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे.समाजातील अनिष्ट रूढी परंपरा झुगारून लावली पाहिजेत व मुलांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून प्रशासकीय सेवेत पाठवणे गरजेचे आहे.
यावेळी कोरोना महामारी आहे,म्हणून अनेक बांधवांना कामानिमित्त बाहेर पडावे लागते. म्हणून मुंबई स्थित असलेले बाळू गोविंद वाघमारे यांनी अक्षय वाघमारे यांचे कडे सैनीटायझर व मास्क देऊन धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मोफत वाटप केले.यावेळी प्रकाश वाघमारे ,महेंद्र वाघमारे ,बाळासाहेब वाघमारे ,सुरज शिंदे, मिलिंद वाघमारे ,बालक वाघमारे ,प्रा. राजू वाघमारे व बौद्ध समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अन्नदान करून धम्मचक्र प्रवर्तन उत्साहात साजरा करण्यात आला.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद