जत नगरपरिषदेच्या तत्कालीन तांत्रिक सल्लागार अभियंत्याच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी : विक्रम ढोणे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत नगरपरिषदेने तांत्रिक सेवा पुरवण्यासाठी सल्लागार अभियंता म्हणून १२ नोव्हेंबर २०१८ नियुक्ती केली होती.सदर अभियंत्याच्या काळामध्ये जत नगरपरिषदेच्या विविध विकास प्रकल्प राबविण्यात आले आहेत. त्या कालावधीमध्ये सुरू केलेले प्रकल्प अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत. अर्धवट स्थितीतील कामांची सर्व रक्कम खर्ची टाकण्याचा संशय आहे.हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून या कालावधीतील सर्व कामकाजाची जिल्हाबाहेरील सक्षम अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे युवक नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे .
जत नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेली सर्व विकास कामे शासन नियमानुसार व अंदाजपत्रकाच्या तरतुदीनुसार न होता निकृष्ठ दर्जाची कामे झाली असून अनेक डांबरी रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.सदर विकास कामांवर फलक लावलेले नाहीत व कामे सुरू असताना संबधित अभियंता यांच्याकडून कामावर प्रत्यक्ष येऊन कामांची पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे संबधित कामाचा दर्जा अतिशय निकृष्ठ असून अशा कामांची बिले मंजूर करण्यात आली असून संबधित तांत्रिक सल्लागार अभियंता फक्त बिले काढण्यासाठीच फक्त नगरपरिषदेकडे येत होते.या सर्व प्रकारची कसून चौकशी झाल्यास सत्य समोर येईल या सर्व प्रकारामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाचा उद्देश सफल झाला नाही. म्हणून तत्कालीन सल्लागार अभियंता यांच्या कार्यकाळतील जत नगरपरिषद अंतर्गत झालेल्या सर्वच संबधित कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे समोर येण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या स्तरावरून जिल्हा बाहेरील सक्षम अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.