विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

नरेंद्र दीक्षित
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. दौऱ्यादरम्यान बाधित व्यक्तींच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे अतिव दुःखाने अश्रु अनावर झाले.

यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पप्पू डोंगरे,माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, भाजपा नेते जयवंतराव सरगर,पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी उपसभापती तानाजीराव यमगर, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, हरीशेठ गायकवाड, युवानेते शेखर रणदिवे यांच्यासह भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती दिली. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, वाया गेलेल्या डाळिंब व फळबागा, जमिनी व पूल आदि बाबींची पाहणी केली.