
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने एकरी सरसकट ५० हजार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे,शेतकरी उध्वस्त झाला आहे.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी धरणे आंदोलन करु,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्याला एकरी ५०,००० रू . नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे,या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा पासून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी निवेदन माळशिरस तहसिलचे नायब तहसिलदार तुषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव नितीन धायगुडे , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब शिंदे, अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बशिर काझी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाहिद भाई मुलानी, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी कविता माने, तालुकाध्यक्ष माऊली सरक, युवा नेते अण्णासाहेब पांढरे, दादासाहेब ठवरे, उपसरपंच रेडे शंकर शेंडगे, नारायण देवकते, ऋतुराज शिंदे सह यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती