
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील मिरवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून अद्यापपर्यंत हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे केंद्र सुरू करणे आवश्यक होते.परंतु ते सुरू न झाल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे. यासाठी कामगार सेनेमार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणेबाबत लेखी निवेदन दिलेले आहे.
यावेळी कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे तसेच महाराष्ट्र कामगार सेना तालुकाप्रमुख सुरेश घोडके,डफळापुर विभाग प्रमुख चैतन्य कोरे,डफळापुर उपविभाग प्रमुख दत्तात्रय कोरे, मिरवाड शाखाप्रमुख सुनील कोरे,जिरग्याळ शाखा उपप्रमुख श्रीराम जो मिसाळ,तासगाव शाखाप्रमुख बिरूदेव बनसोडे या सर्वांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटून लेखी निवेदन दिलेले आहे. याबाबत लवकरच कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना पुढील कारवाई करण्यासाठी मंत्री यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती