
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना हेक्टरी ५० हजार मदत व माळशिरस तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्यासाठी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
परतीच्या पावसाने नदीकडेच्या व इतर गावात खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.गुरेढोरे,उभी पिके, घरांची पडझड,अन्न,वस्त्र संसार उपयोगी साहित्य सगळे वाहून गेले.त्यामुळे पंचनामे वगैरे न करता थेट ५o हजार मदत व माळशिरस तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नामदेव काळे यांना दिले.
यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे ,मनसे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, तालुका उपाध्यक्ष रोहीत खाडे ,अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, अकलुज जि प गट विभाग अध्यक्ष विनोद सावंत, माळशिरस शहर अध्यक्ष सुरेश दादा वाघमोडे ,शहर संघटक अमीत दोशी, सहकार सेना तालुका अध्यक्ष संदीप दादा सिद, सचिन सिद ,स्वप्नील कदम इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती