मिटकी तलावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल: हणमंतराव देशमुख

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच विहिरींचे झालेल्या नुकसानीची पाहणी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
फुटलेल्या तलाव दुरुस्ती न करता नवीन तलावाची मंजुरी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून मिळावी अशी मागणी सरपंच तसेच गावकऱ्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष इंजि.अनिता पाटील यांच्या माध्यमातून तलावाची संपुर्ण माहिती घेऊन अहवाल पालकमंत्री यांना देणार असल्याचे तसेच चौकशी लावून दोषींवर कारवाई करणार असल्याचे तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना संपूर्ण मदत मिळवून देण्यात येईल असे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यासह महिला आघाडीच्या तालूका अध्यक्ष सौ.अश्विनी आष्टेकर, सरचिटणीस समाधान नळ-भोसले,राजेंद्र सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.