
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
परतीच्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे जत तालुक्यातील सर्वच गावांमधील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून त्या पिकाचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्या शेत जमिनीच्या मालकाला सोबत घेऊनच करा,असे आवाहन राज्याचे कृषी,सहकार,पणन राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी जत येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,युवा नेते जितेश कदम,जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी,तालुका अध्यक्ष आप्पराया बिराजदार, प्रातांधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर,पं स सदस्य रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण,पिराप्पा माळी, बाबासाहेब कोडग,युवक नेते विक्रम ढोणे,काका शिंदे,बांधकाम सभापती साहेबराव कोळी,माजी नगरसेवक परशुराम मोरे,अप्पू माळी व गणेश गिड्डे यांच्यासह कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करा.महाविकास आघाडीचे सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे व यापुढेही राहणार असल्याचे कदम म्हणाले.
यावेळी बोलताना पं.स सदस्य रवींद्र सावंत म्हणाले की, रोजगार हमी योजनेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसून कर्मचारी नागरीकांना चुकीची माहिती देतात व बिले काढण्यासाठी 500 रुपयांची मागणी करतात.गटविकास अधिकारी पण दुर्लक्ष करतात.हाच मुद्दा जि. प सदस्य सरदार पाटील यांनी उचलून धरत पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप केला.तर यांवर मंत्री कदम यांनी गटविकास अधिकारी यांना चांगलेच खडसावत मी मंत्री असतांना भ्रष्टाचार चालणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याचे चौकशी करून 48 तासाच्या आत अहवाल पाठवून देण्याचे आदेश दिले.
यावेळी बोलताना कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पराया बिराजदार म्हणाले की,जत शहरानजीक 300 ते 350 एकर शासन मालकीची जागा शिल्लक असून त्याठिकाणी कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करावा अशी मागणी केली.
जत तालुक्यातील गोंधळवाडी येथे माझे कुटुंब माझी माझी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणासाठी आशा सेविकेना गावकरी गावांत येऊ देत नसल्याने सर्वेक्षण करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. यावर मंत्री कदम यांनी गावातील सरपंच,उपसरपंच व ग्राम समितीचे सदस्य यांनी एकत्र येऊन जबाबदारी पार पाडावी.त्यातून जर नागरिकांनी नाही ऐकले तर वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्त वापरावा व सर्वेक्षण पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन