नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
गेली आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे आटपाडी -सांगोला मार्ग अति पावसाच्या पाण्यामुळे बंद पडलेला आहे.महामार्गावरील माडगुळे गावाजवळील ओढ्यावर असणाऱ्या पुलावरून भरपूर प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे वाहतूक बंद पडली आहे.
गेली बारा वर्षेपूर्वी याच पुलावरून पाणी गेल्यामुळे तेव्हाही वाहतूक बंद पडली होती. तेव्हापासून आजतागायत या पुलावरून पाणी गेले नव्हते.मात्र यावर्षी परतीच्या मान्सूनमुळे या पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक बंद पडली. माडगुळे परिसरात गेले आठदिवसापासून भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे डाळिंब, द्राक्षे, कलिंगड,मिरची ,टरबूज ,पपई ,बाजरी , मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.बळीराजाने लाखो रुपये खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याचे जतन केले.मात्र या पावसामुळे त्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतल्याप्रमाणे झाला आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे.त्यांच्या डोक्यावर बँकेची कर्जे ,खासगी सावकाराचे कर्ज ,नजरेसमोर दीपावली सण दिसत आहे.त्यामुळे तो हतबल झाला आहे.त्यांना योग्य ती शासकीय मदत मिळावी,अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन