
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी व विमा कंपनीकडून भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शासनाने पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन लंगुटे यांना आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख,राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ.अनिता पाटील, महिला आघाडीच्या तालूकाध्यक्ष सौ.अश्विनी आष्टेकर, सरचिटणीस समाधान नळ-भोसले,राजेंद्र सावंत व इतर मान्यवर उपस्तिथ होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन