
विश्वास गायकवाड
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /बोरघर-माणगांव:
रायगड जिल्ह्यातील वडपाले या गावात महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव यांच्या सौजन्याने मृदचाचणी व एकात्मिक खत व्यवस्थापन पध्दती या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
शेतकऱ्यांना मंडळ कृषि अधिकारी पडवळकर यांनी एकात्मिक खत व्यवस्थापन पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले.न मृदचाचणी या विषयावर कृषी पर्यवेक्षक ससाणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेती संबंधीत विवीध योजनेचे व शेती पुरक योजनां विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. णच मध
यावेळी कृषी विभागातील शिंदे, सुरडकर, राम कदम, नलावडे, उगले, श्रीमती जगताप मॕडम तसेच वडपाले गावचे शेतकरी गणपत शिंदे, तानाजी शिंदे, गजानन शिंदे, बाबूराव शिंदे, अशोक शिंदे,अनंत शिंदे यांचेसह शेतकरी व महिला वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक मयुर कोळी यांनी केले.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा