टेंभू योजनेतील वंचित गावांना न्याय मिळवून देणार- जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील

मोहनराव पुजारी
आटपाडी/प्रतिनिधी:

टेंभू योजनेतील वंचित गावांना न्याय मिळवून देणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी शिष्टमंडळास दिले.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या बरोबर टेंभू योजनेतील वंचित गावांना नक्कीच न्याय मिळवून दिला जाईल व त्याविषयीची थोड्याच दिवसांत मंत्रालयातील कक्षात बैठक लावून टेंभू योजनेचा प्रलंबित विषय पूर्णत्वास जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रा.एन.पी.खरजे व शिष्टमंडळ यांना आश्वासित केले. यावेळी प्रविण गावडे, दिलीप कचरे,राघवदादा मेटकरी,सागर पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.