
अनिल मदने
जत /प्रतिनिधी:
जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी व कामगार बचावो दिवसाच्या निमित्ताने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जत तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार, पं.स. माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे,पं.स.सदस्य रविंद्र सावंत,पं. स.दिग्विजय चव्हाण,मार्केट कमिटी संचालक अभिजितदादा चव्हाण,सांगली जिल्हा काॅग्रेसचे ओबीसी अध्यक्ष तुकाराम माळी,माजी नगरसेवक महादेव कोळी,नगरसेवक नामदेव काळे,विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज बाळ निकम,माजी ग्रा.प.सदस्य सलीमभाई पच्छापूरे,माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक मुन्ना पखाली,सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस रमेश कोळेकर,जत तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास माने,NSUI तालुका अध्यक्ष बाळू बामणे,उपाध्यक्ष गणी मुल्ला,जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे,फिरोज नदाफ,बाळासाहेब तंगडी,अप्पू माळी,प्रदीप नागणे,युवक काँग्रेस सरचिटणीस पपु कोडग,मिथुन माने,अमर माने,अतुल मोरे तसेच सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन