
आटपाडी/प्रतिनिधी:
पडत्या काळात भारतीय जनता पार्टी घरोघरी पोहोचवण्याचे काम करणारे सांगली जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण बाबुराव पडळकर यांचे आज निधन झाले.
आटपाडी तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष, सांगली जिल्हा उपाध्यक्ष, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विस्तारक आदी पदांवर काम केले होते. तसेच 1999 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करुन भारतीय जनता पार्टी घरोघरी पोहोचविण्याचे काम अहोरात्र केले. त्यांनी संघटनेवरील व पार्टीवरील निष्ठा कधीही ढलू दिली नाही. कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता काम केले.
“संघटनेने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कसलीही तक्रार न करता समर्थपणे पार पडल्या.संघटनेवर प्रेम करणाऱ्या अशा कार्यकर्त्याला संघटना मुकली व ते आज आपल्यातून निघून गेले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो” अशी श्रद्धांजली भाजपाचे आटपाडी तालुका अध्यक्ष विलासराव काळेबाग यांनी वाहिली आहे.
रक्षाविसर्जन कार्यक्रम दि. 27 रोजी सकाळी आठ वाजून 15 मिनिटांनी पडळकरवाडी येथे होणार आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन