
शुक्रवार दि. 25 सप्टेंबर, 2020 ला आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणावर सरकारला जाग येण्यासाठी ‘ढोल बजाव, सरकार जगावं’ आंदोलन पुकारलं आहे. त्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी, विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय इथे सकाळी 10 वाजता ढोल वाजवून आंदोलन करायचं आहे. ज्याना इथे जाण शक्य नाही त्यांनी ग्रामपंचायती समोर ढोल वाजवा.
या वेळी सोशल डिस्टन्सीचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करा. तोंडावर मॉस लावा. खिशात सॅनिटायझरची लहान बाटली ठेवा. हातात पिवळे झेंडे घ्या. एक बॅनर तयार करा. त्या वर लिहा
‘धनगर st आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा.’
कपाळाला भंडारा लावा. कोणीही एकमेकाला हात मिळवू नका,एकमेकाला हात जोडून आणि अंतर ठेवून नमस्कार करा.
कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त जमेल तेवढा वेळ ढोल वाजवा. गळ्यातील ढोल आदली बदली करताना तो सॅनेटाईज करा.
घोषणा द्या
१ येळकोट येळकोट-जय मल्हार!
२ आरक्षण आमच्या हक्काचं- नाही कुणाच्या बापाचं!
३ धनगर आरक्षण अंमलबजावणी- झालीच पाहिजे!
४ कोण म्हणतो देत नाही-घेतल्या शिवाय रहात नाही!
५पुण्यश्लोक अहिल्यादेविंचा-विजय असो.
हे आंदोलन जबरदस्त झालं पाहिजे. महाराष्ट्र हादरला पाहिजे. विराट शक्ती प्रदर्शन करा.
या आंदोलनाची घोषणा आ. पडळकर यांनी केली आहे म्हणून नाही. हे आंदोलन करा म्हणून मी पोस्ट लिहिली आहे म्हणून नाही. तर हे आंदोलन तुम्ही तुमच्यासाठी करायचं आहे. तुमच्या गर्भातील पिढीसाठी करायचं आहे. तुमच्या आधीच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. त्यांना आता जीवदान मिळत नाही, पण जे गर्भात आहेत, त्यांना तरी सुरक्षा मिळावी,आरक्षणाचे फायदे मिळावे म्हणून आंदोलन करा.
भांडायला, एकमेकांना शिवीगाळ करायला अख्ख आयुष्य पडलं आहे. त्या महत्वाच्या भांडणातील फक्त 5/6 तास काढा आणि ढोल बजाव सरकार जगावं आंदोलन सहभागी व्हा!
बापू हटकर

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद