
मोहनराव पुजारी
आटपाडी /प्रतिनिधी:
आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने केवळ प्राथमिक शिक्षकांना शासनाने विमा संरक्षण नाकारल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचे निवेदन गट विकासअधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांना देण्यात आले.
यापूर्वी covid-19 अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी चेक पोस्ट ड्युटी या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. शिवाय ऑनलाइन,ऑफलाइन ,शैक्षणिक काम सुरू आहे . तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणात केवळ प्राथमिक शिक्षकांना 50 लाखाचे विमा संरक्षण नाकारले आहे. त्यामुळे एखादी अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण? म्हणून जिल्हास्तराप्रमाणे तालुकास्तरावर समन्वय समितीच्या माध्यमातून बहिष्काराचे निवेदन देण्यात आले. तरी सर्व प्राथमिक शिक्षकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता ठाम रहावे. समन्वय समिती आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे .यावेळेस सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, शिक्षक संघ शि.द. पाटील गटाचे अध्यक्ष यशवंतराव गोडसे ,शिक्षक संघ थोरात गटाचे अध्यक्ष असिफ मुजावर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे अध्यक्ष रावसाहेब देवडकर,शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष बिरुदेव मुढे,तालुका शिक्षक पतसंस्था चेअरमन शिवाजी लेंगरे, तंत्रस्नेही दत्तात्रय सुतार ,सुनिल पवार आदी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद