
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रेरणेने तसेच जलबिरादरी चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून “अग्रणी नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्प” या प्रकल्पांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी अग्रणी नदी खोऱ्यामधील प्रत्येक गावा-गावात जलसंधारणाची वेगवेगळ्या प्रकारची कामे लोकसहभागातून राबवत आहे.या सर्व कामातून आज अग्रणी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे.
अग्रण नदी खोऱ्यामध्ये खानापूर,तासगाव,कवठेमहंकाळ,जत आणि मिरज या 5 तालुक्यातील 107 गावांचा समावेश आहे. खलाटी हे गाव अग्रणी नदी खोऱ्यातील जत तालुक्यातील सर्वात उंचावरचे गाव आहे. नेहमी काम करत असताना “माथा टू पायता” या भूमिकेतून काम करतात,यापूर्वीही खलाटी गावात खलाटी ओढ्यावरती श्री लखाबाई मंदिराच्या शेजारी एक सिमेंट बंधारा बांधला आहे तसेच या गावाला फॉरेस्ट जमीन जास्त असल्याने पूर्वी 30 हेक्टर वरती डीप सी.सी.टी.चे काम केले आहे. आज आणखीन 25 हेक्टर वनजमिनीवर डीप सिटीच्या कामाची सुरुवात केली आहे.
उद्घाटनप्रसंगी जलबिरादरीचे जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर,सागर साळुंखे,बालाजी चव्हाण,वनपाल आप्पासो पवार,वनरक्षक गोविंद नरोटे,शिवाजी संकपाळ,नरेंद्र कोळी,उपसरपंच अशोक जाधव, वनकमिटी अध्यक्ष नागेश बनसोडे, राहुल बनसोडे,नवनाथ कोळी, साहेबराव शेजुळ,नारायण शेजुळ,खंडेराव बनसोडे तसेच खलाटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन