शाखा अभियंता संग्राम कांबळे यांचा आदर्श अभियंता निवडीबद्दल सत्कार

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी:

जत पंचायत समितीचे लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संग्राम कांबळे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श अभियंता पुरस्कारासाठी निवड झाली.
जत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष अभियंता म्हणून संग्राम कांबळे यांची ओळख आहे. त्यांची आदर्श अभियंता पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल सत्कार करताना बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, प्रभारी बापू आठवले, प्रभारी हणमंत नाटेकर, राजू कांबळे, महासचिव शरद शिवशरण, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन इ. उपस्थित होते.