
सुभाष हाक्के
कोसारी/प्रतिनिधी:
तब्बल अकरा वर्षांनंतर कोसारी परिसरात पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. डाळींब,ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आला आहे. नदी नाल्यासह मोठमोठे तलावही भरून चालले आहेत.
कोसारी तलाव क्र 02 मधील पाणी तलावनजीकच्या घराच्या उंबरठ्यावर पोहचल आहे. संरक्षण भिंत फक्त कागदावरच आहे.ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याची कमतरता दिसून येते. जनतेचा विषय गंभीर बनला आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस संबंधित चौदा कुटुंबियांना गावठानमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला असुनही ग्रामपंचायत यावर निष्क्रीय असलेची माहीती तेथील नागरिकाकडुन मिळत आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन