
सुभाष हाक्के
कोसारी/प्रतिनिधी:
कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानासुद्धा गुळवंची येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची शाळेत ऑनलाईन शिक्षण चालु ठेवले आहे . अशा परस्थीतीत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेने कोसारी गावचे युवक नवनाथ कदम(मुंबई पोलीस) यांनी इयत्ता दहावीमध्ये अध्यापन करणाऱ्या काही गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच गावातील इतर दानशूर व्यक्तींनीसुद्धा शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करावे असे आवाहन केले. मुख्याध्यापक दिनकर खुटाळे यांनी विद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक संघ सांगलीचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार. सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गोरे,रावसाहेब खरात,संभाजी खटके,गुळवची विद्यालयाचे गुरव सर, बाबर सर, सरगर सर, घोडके मॅडम, राजेंद्र फोन्डे, चंदू पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद