
देवानंद जावीर
सांगली/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सुरक्षतेसाठी वाटप केले जाणारे किट हे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी स्वरूपात वाटले गेले आहे. त्यामुळे अनेक कामगारांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. हे प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या वारंवार लक्षात आणून देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले जाते.या निषेधार्थ सोमवार दि.14/9/ 2020 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सांगली येथे सर्व संघटना समन्वय समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार आहे.असे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सांगली अनील गुरव यांना देण्यात आलेले आहे. यावेळेस समन्वय समितीचे अध्यक्ष शंकरदादा माने, बहुजन कामगार संघटनेचे सल्लागार प्रा. दत्ता हेगडे, स्वराज्य जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अमित कदम, सविता कुंभार, पोर्णिमा कांबळे, विजय वाघमारे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन