अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
श्रीसंत बाडगेबाबा मानव मित्र संघटना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मागील काही दिवसांमध्ये आपल्या सांगली जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात कोरोनासारख्या महाभयानक रोगाचां खूप मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग वाढला आहे. दिवसेंदिवस शेकडो नागरिक या कोरोनाला बळी पडत आहेत. त्यातील काही जण मरण पावत आहेत.
ज्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 19 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता, त्यावेळी लगेच 23 तारखेला कडक लॉकडाऊन व सर्व सीमा व आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या होत्या. त्यावेळी रुग्णांची संख्याही फार कमी व मोजकीच होती.परंतु सध्याच्या घडीला परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे. रोज वीस हजाराच्या आसपास रुग्ण एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये सापडत आहेत.रोज एक हजारच्या आसपास रुग्ण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सापडत आहेत.
सदरील परिस्थिती खूप भयानक व भयावह असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु त्याच्या उलट या गोष्टीला कोणी गांभीर्याने घेत नाहीत. सोशल डिस्टन्सचे पालन व्यवस्थित होताना दिसत नाही. किती तरी नागरिक विना मास्क फिरताहेत.प्रशासनाचा कुणावर वचक किंवा या सर्व बाबींवर लक्ष कमी झाले आहे. अशा सर्व कारणांमुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती खूप बिकट अवस्थेत आहे.तरी सदरील परिस्थितीला आळा घालण्यासाठी शहरी भागांमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन व मास्क कंपल्सरी करणे आवश्यक आहे व ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींना गावातील नागरिकांना योग्य ती दक्षता घेण्यासाठी नियमावली तयार करावी व ग्रामपंचायत मधील पंधरावा वित्त आयोगातील तरतूद असलेल्या पन्नास टक्के रकमेमधून गावांमध्ये जंतुनाशक फवारणी सॅनीटायझरच्या बॉटलचे वाटप मास्कचे वाटप त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम व इतर औषधे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी व ही वाढत चाललेली कोरोणाची साखळी कमी करावी अशी मागणी केली आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन