आटपाडी/प्रतिनिधी:
आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील इयत्ता चौथीच्या वर्गात असणाऱ्या दोन जुळ्या भावंडाचा नालाबांधातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आटपाडी तालुक्यात एकाच दिवशी पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला.
बाळेवाडी येथील हैबतराव कोळेकर यांना लव आणि अंकुश नावाची दोन जुळी मुले होती. गुरुवार दि.10 रोजी मेंढ्या चारण्यासाठी ती माळरानात गेली होती.रानात नालाबांधामध्ये पावसाने साठलेल्या पाण्यामध्ये एकजण खेळत गेला असता,खोलवर पाण्यात त्याचा पाय गाळात रुतत गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा जुळा भाऊ गेला असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.इयत्ता चौथीच्या वर्गात गेलेली ही दोन जुळी मुले जन्माला येतानाही एकत्रच श्वास घेतला व शेवटचा श्वासही एकत्रच घेतला. कबड्डीच्या खेळामध्ये ही मुले खूप तरबेज होती.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.एकाच दिवशी आटपाडी तालुक्यात पाण्यात पडून चौघाजणांचा जीव जाण्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन