बुलडाणा जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी एस राममुर्ती यांनी स्विकारला पदभार

सुभाष मोरे/लोणार (बुलढाणा):
बुलडाणा जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या अभ्यासदौ-यावर गेल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुखराजन यांच्याकडे सोपविला होता. त्यांच्याकडुन नुकताच एस राममुर्ती यांनी पदभार स्वीकारला. यापुर्वी ते अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नागपूर येथील खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते.जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेतला.हुशार आणि अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले एस राममुर्ती मुळचे तामिळनाडू राज्यातील आहेत.