
मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी:
औसा येथे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमख उपस्थित महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंतासह प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची सूचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या.
या आढावा बैठकीत ३० डिसेंबर रोजी आ.अभिमन्यू पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मांडण्यात आलेल्या सुचनेवरुन कोणते कामे पूर्ण झाले व कोणती कामे अद्याप झालेली नाहीत याची माहिती घेतली. उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांनी त्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या समस्यापैकी ६१ कामे पूर्ण केल्याची माहिती दिली.या बैठकीत शेतकऱ्यांनी वीज जोडणी लवकर मिळत नाही,रोहित्री लवकर दिल्या जात नाहीत अशा तक्रारी केल्या. संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांच्या विभागातील महावितरण अभियंता यांना बैठकीत याबाबत जाब विचारुन शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सुचना करीत संबंधित शेतकऱ्यांना मांडलेली अडचण सांगितलेल्या वेळीत महावितरण कंपनीने नाही सोडविल्यास आपणाकडे याची माहिती द्यावे असे आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती