
मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी:
काल रात्रीला एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र कहर माजवला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अनेक गावशिवारात पावसाने जोर दिल्याने रात्रीच्या पावसाने तहसिल जवळील मिनी शॉपिंग सेंटरमध्ये गटारीचा गाळ व घाण पाणी शिरुन दुकानाचे आतोनात नुकसान झाले आहे.मोमीन गल्ली येथे अनेकांच्या घरात पावसाचे व गटारीचे पाणी शिरल्याने नागरिक रात्रीपासून त्रस्त आहेत. औसा-उंबडगा या दोन गावाना जोडणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असुन वाहतूक बंद झाली आहे.तर सध्याला शेतात उभे असलेल्या सोयाबिन पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून सोयाबिन पिकातून हातात चार पैसे मिळण्याची आशा असताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.आता घरप्रपंचाचा खर्च कसा भागवावा ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती