
नंदकुमार विभुते
आटपाडी/प्रतिनिधी:
आटपाडी येथील ओढ्यात मायलेकरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राणी चंद्रकांत पारसे व पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे अशी मृतांची नावे आहेत.
निसर्गाचा लहरीपणाने पावसाची जवळजवळ संपूर्ण नक्षत्रे वाया गेली,दिवस वाया गेले असताना आटपाडी व परिसरामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे आटपाडी ओढ्याला पाणी आले आहे.त्यातच टेंभू योजनेचा विसर्ग जास्त असल्यामुळे व पडलेल्या पावसाचे पाणी जास्त असल्यामुळे आटपाडी तलाव पाण्याने पूर्ण भरल्यामुळे आटपाडी ओढ्याला भरपूर प्रमाणात पाणी वाढत आहे.
अशा परिस्थितीत ओढा पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या राणी चंद्रकांत पारसे (वय वर्ष 32 रा. सोमेश्वरनगर आटपाडी) व मुलगा पृथ्वीराज उर्फ दादा चंद्रकांत पारसे ( वय वर्षे 10) हे दोघे गेले असता मुलगा पाण्यामध्ये खेळत होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहत चाललेला आईला दिसला. तिने आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.परंतु ती यात अपयशी ठरली.पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ती पाण्यात आज सकाळी साडेअकरा वाजता वाहून गेली.त्यांना शोधण्यासाठी प्रशासन व नागरिकाच्या प्रयत्नामुळे दुपारी दोन्ही मृतदेह सापडले.त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांना आव्हान केले आहे की,पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे नागरिकांनी ओढा पत्रात जाऊ नये व गेले तरी स्वतःची काळजी घ्यावी व सतर्क रहावे असा इशारा दिलेला आहे.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी शेळके,आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील,ॲड. धनंजय पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, सर्जेराव राक्षे, दत्तात्रय पाटील ,तलाठी सुधाकर केंगार यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती