
मुख्तार मणियार/औसा,प्रतिनिधी:
औसा शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ११६ थकित लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याची निधी रक्कम त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी 8 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी औसा येथील सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला यांनी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, औसा नगरपालिकेमार्फत औसा शहरातील एकूण 245 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर झाली आहे.त्यापैकी फक्त 116 लाभार्थ्यांना दोन हप्त्यात एकूण एक लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या रकमेतून 116 कुटुंबांनी स्वतःचे राहते कच्चे घर पाडून बांधकाम चालू केले आहेत व ते बांधकाम अर्धवट स्वरूपात असून त्याची पुढच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम न मिळाल्याने मागील सात-आठ महिन्यांपासून थांबले आहे. काही लोकांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून बांधकाम पूर्ण केले आहे. तरी या त्रस्त असलेल्या लाभार्थींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खूनमीर मुल्ला यांनी नगरपालिकेसमोर 8 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेला दिला आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती