
मुख्तार मणियार
औसा /प्रतिनिधी :
औसा शहरातील नगरपरिषद मुख्य शॉपिंग सेंटरला व होत असलेल्या जमालनगर भागातील गार्डनला माजी नगराध्यक्ष मरहूम मुजिबोद्दीन पटेल यांचे नाव देण्यात यावे,यासाठी सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला यांनी औशाचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनामध्ये औसा शहराचे सूपूत्र तथा औसा शहराचे १७ वर्ष नगराध्यक्ष व ३५ वर्ष नगरसेवक पदाची जबाबदारी सांभाळून औसा शहर शांतता व सुखव्यवस्थासाठी अग्रेसर राहुन औसा शहर राज्यातील शांतता प्रिय शहर म्हणून नामोल्लेख ओळख ठेवली. आपल्या कार्यकाळात औसा नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे पार पडली. शासनाच्या निधीवर अवलंबुन न राहता औसा नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी औसा शहरात विविध ठिकाणी ११६ नगरपरिषद मालकीचे गाळे बांधले.औसा शहरासाठी दोन मोठ्या पाण्याची टाकीची निर्मिती केली आहे.आलमला गाव परिसरात पाणी फिल्टरची निर्मिती केली. शहरात भाजी मंडईची निर्मिती केली.गोरगरिबासाठी अल्पदरात नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाची उभारणी केली.लहान मुलांसाठी शहरात दोन ठिकाणी सुजाण गार्डनची निर्मिती केली.अशा या विकास पुरुषाला खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील नगर परिषद मुख्य शॉपिंग सेंटर व गार्डनचे मरहूम डॉ.मुजिबोद्दीन पटेल असे नामकरण करण्यासाठी एकमताने नगरपरिषदेचे ठराव पारित करावे,अशी मागणी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्फत नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांना औशाचे सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद