आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

मुख्तार मणियार
औसा /प्रतिनिधी :

इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे नरवीर, आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आमदार कार्यालयामध्ये प्रा.भीमाशंकर राचट्टे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन  करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लहू कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भीमाशंकर राचट्टे,जेष्ठ कार्यकर्ता अध्यक्ष दिगंबर माळी, विद्यार्थी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण मिटकरी, तालुका महासचिव शिवकुमार मुर्गे,शहर महासचिव उन्मेष वागदरे,संतोष चिकुर्डीकर,संजय भंडारी,कान्हा ठाकूर,सागर अपुणे,हणमंत सूर्यवंशी, नितीन कांबळे ,श्रीकांत स्वामी आदी उपस्थित होते.