पाचेगाव बु. येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

सांगोला/प्रतिनिधी:
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी जयंती कोरोना सुरक्षित नियमावली पाळत ग्रामपंचायत पाचेगाव बुद्रुक (ता.सांगोला) येथे साजरी करण्यात आली.
उपसरपंच मच्छिंद्र कांबळे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मंडले,माजी सैनिक मोहन घोडके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे विचार आत्मसात करुन तरुणांनी वाटचाल करावी.व्यसनापासून दूर रहावे.आपली प्रगती करावी.संघटन कौशल्य आत्मसात करावे असे विचार माजी सैनिक मोहन घोडके यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत लिपिक शशिकांत मंडले,संगणक परिचालक संजय खरात,कर्मचारी अशोक दौंड,अशोक कांबळे,उमेश मंडले,शरद मंडले,अर्जुन सुतार,मल्हारी मंडले,सुनिल मंडले,बाळासो मंडले,जयसिंग मलमे,आप्पासाहेब पाटील,अथर्व मंडले,राजवीर मंडले,बाबुराव मंडले,क्षितिज मलमे,विकास मंडले,अभिजीत मंडले उपस्थित होते.