
आटपाडी / प्रतिनिधी:
दिघंची-हेरवाड राज्य मार्गाचे काम करताना शेटफळे येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरे आणि व्यापारी गाळे पाडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि घरे पाडणाऱ्या लोकांना अधिग्रहण कायद्याप्रमाणे मोबदला द्यावा,यासाठी आज तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेने ठिय्या आंदोलन केले.
दिघंची- हेरवाड राज्य मार्गाचे काम गेल्या दीड वर्षापासून वेगात सुरू आहेत.सध्या शेटफळे गावातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा गेल्या अनेक वर्षापासून असलेली बांधकामे ग्रामपंचायतीने मालमत्ताधारकांना नोटीस देऊ पाडली आहेत. सत्तर वर्षापूर्वीचे जुने वाडे असलेल्या मालकांनाही नोटिसा दिल्या आहेत.या मालमत्तेची सत्तर वर्षांपूर्वी भूमिअभिलेख कार्यालयाकडे नोंदणी केली आहे.असे असतानाही घरे पाडली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश गायकवाड,अमित गिड्डे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसिलसमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनामध्ये शशिकांत गायकवाड, रणजीत जाधव,दत्तात्रय कुंभार, शशिकांत बिराजदार, प्रमोद शिरसागर यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन