सुभाष मोरे/ बुलढाणा ,प्रतिनिधी:
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा आढावा जिल्हा दौ-यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले.
नुकसानग्रस्त पिकाबरोबरच कृषीमंत्री भुसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोरका) चा सुध्दा आढावा घेतला.बुलडाणा जिल्ह्यातील पोकराच्या अंमलबजावणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकल्पातील योजनांना गती देऊन जास्तीत जास्तं लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.तसेच शेतक-यांना कमी खर्चात दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर अहिल्याबाई होळकर रोपवाटिका सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार प्रतापराव जाधव,जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, आमदार संजय गायकवाड, डॉ.संजय रायमुलकर, तसेच संबधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक